Monday, July 1, 2024

Marathi Hindi Christian Books

शब्बाथ या विषयावर प्रकाश टाकणारे एक उत्तम पुस्तक, ख्रिस्ती लोकांनी शब्बाथ पाळला पाहिजे का? शब्बाथ म्हणजे नेमका कोणता दिवस? खरा शब्बाथ काय आहे? अशा 20 पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे एकाच पुस्तकात, आजच खरिदी करा...
  
या पुस्तकातील प्रश्नांपैकी एक प्रश्न आणि त्याचे उत्तर 

कॉन्स्टंटाईनने शनिवार ते रविवार असा शब्बाथ दिवस बदलला का?

इसवी सन 321 मध्ये, कॉन्स्टंटाईनने फर्मान काढले, "सूर्याच्या आदरणीय दिवशी दंडाधिकारी आणि शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना विश्रांती द्या आणि सर्व कार्यशाळा बंद करा" (कोडेक्स जस्टिनियनस लिब. 3, टिट. 12, 3; ट्रान्स. इन  फिलिप शॅफ, हिस्ट्री ऑफ द ख्रिश्चन चर्च, खंड 3, पृ. 1).

वरील जी आज्ञा केलेली आहे ती कॉन्स्टंटाईनने या रोमन सम्राटाने प्रशासकीय आज्ञा केलेली आहे. प्रस्तुत आज्ञेचा आणि ख्रिस्ती मंडळीच्या सहभगितेचा काहीही संबंध नाही. कॉन्स्टंटाईनच्या काळापर्यंत पोपच्या सत्तेचा उदय झालेला नव्हता. हा फर्मान त्या काळातील मंडळीला दिलेला फर्मान नव्हता तर रोमी राजवटीत सुट्टीचा दिवस घोषित करण्यात आलेला होता. इतिहासाच्या अभ्यासावरून आपल्याला कळते की कॉन्स्टंटाईन आणि यहुदी लोकामध्ये कोणताही द्वेष नव्हता, तसेच त्या काळी शब्बाथ पाळण्याविषयी कोणताही चर्चित असा वाद नव्हता. कारण त्या काळापर्यंत मंडळी सहभागीतेसाठी रविवारीच भेटत असे. ही रीतच लागू झालेली होती. आणि जवळजवळ ही रीत प्रेषितांच्या काळापासूनच नव्या कराराच्या मंडळीपासूनच लागू झालेली होती. 

No comments:

Post a Comment