उत्पत्ती पुस्तकांनुसार देवाने सूर्य व तारे चौथ्या दिवशी निर्माण केले मग त्याच्या आधी तीन दिवस कोणत्या आधारावर गणले गेले?
सर्व प्रथम आपण उत्पत्तीचा तो वृत्तांत पवित्र शास्त्रमधून पाहू...
लक्षपूर्वक वाचूया सूर्य व ताऱ्यांविना पहला दिवस,
उत्पत्ती 1:1-5
प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला ‘दिवस’ व अंधकाराला ‘रात्र’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.
तसेच चौथ्या दिवशी सूर्य , चंद्र व ताऱ्यांची उत्पत्ती
उत्पत्ती 1:14-19
मग देव बोलला, “दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखवणार्या होवोत; पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत;” आणि तसे झाले. देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या; दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत; आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र ह्यांवर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार ह्यांना भिन्न करावे, म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या; देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा चौथा दिवस.
वरील शास्त्र वचनांमधून आपणास कळते की देवाने सूर्य, चंद्र व तारे निर्माण होण्याआधी तीन दिवस झाले. अनेकांना हे अशक्य वाटते कारण त्यांना एवढेच माहीत आहे की सूर्य उगवला की दिवस होतो व रात्री तारे दिसतात, तर चला जाणून घेऊयात सूर्य व तारे यांच्या उत्पत्ती अगोदर दिवस व रात्र कसे झाले.
सर्व प्रथम आपण वचनात वाचतो की देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली तेव्हा पृथ्वीवर अंधकार होता; मग देवाने प्रकाश निर्माण केला. सध्या सूर्य हा प्रकाशाचा स्रोत आहे. मग हे कसे शक्य आहे?
खिस्ती असल्या कारणाने आपण बिग बॅन्ग़च्या करोडो वर्षाच्या थेअरिवर विश्वास ठेवत नाही. देवाने या ब्रम्हाण्डाची निर्मिती केवल सहा दिवसात केली असा आमचा विश्वास आहे. परंतु बिग बॅन्ग थेअरी नुसार जेव्हा बिग बॅन्ग झाला त्याच्या 3 लाख वर्षानंतर सर्वात प्रथम प्रकाश तयार झाला आणि त्याच्या कित्येक वर्षानंतर प्रकाश देणारे तारे निर्माण झाले. जर बिग बॅन्ग थेअरी प्रकाश कोण्त्याही श्रोता सिवाय निर्मित होऊ शकतो हे सांगते तर देवाच्या वचनावर आपण शंका घेणे मूर्खपणाचे नाही का?
देवाचे वचन बिग बॅन्ग थेअरी पेक्षा कित्येक पटीने विश्वसनिय आहे.
दुसरे म्हणजे प्रकाशापासुन अंधकार वेगळे करणे. आपण जेव्हा बाइबल वाचतो आपल्याला कळते की 'प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी जेव्हा निर्माण केली तेव्हा सर्वत्र अंधकारच होता.' अवकाश शास्त्राचा अभ्यास करणारे सर्व या गोष्टीशी सहमत आहे की सुरवातीला फक्त अंधकारच होता, त्याला ते 'डार्क मॅटर' असे म्हणतात. या एनर्जी मुळे अवकाशातील प्रत्येक तत्व संतुलित गतीत फिरतात. जेव्हा देवाने प्रकाश निर्माण केला तेव्हा देवाने प्रकाश आणि अंधकाराला वेगळे केले. अर्थात प्रकाश आणि अंधार ही स्थिती किवा कोणत्याही वस्तुपासुन निघणारे प्रभाव नसुन स्वतंत्र अस्तित्व असणारे पदार्थ आहेत. हे विज्ञाना द्वारे कधीच सिद्ध झालेले आहे. परंतु बाइबल कसे चुकीचे आहे हे दाखवण्यासाठी आक्षेपवादी असले प्रश्न उपस्थित करून ख्रिस्ती लोकांना गोंधळात पाडण्याचा प्रयत्न करतात.
जेव्हा देवाने पृथ्वी बनवली ती आकारविरहीत होती. देवाने जेव्हा प्रकाश आणि अंधकार वेगळा केला तेव्हा पृथ्वीला आकार मिळाला. त्यातुनच दिवस व रात्र होऊ लागले. देवाच्या वचनात आपण स्पष्टपणे वाचतो की देवाने प्रकाश व अंधकार दोन्ही वेगळे केले, ह्या गोष्टी तून आपल्याला कळते की त्यावेळेस पृथ्वीच्या दुसऱ्या भागात अंधकार होता. पृथ्वी स्वत:भोवती फिरते, आणि स्वतःभोवती एक पूर्ण फेरी घेण्यास तिला २४ तासाचा कालावधी लागतो. आणि याच परिवहन गती मुळे दिवस व रात्र होते.
यामुळेच अगोदर चे तीन दिवस गणले गेले. देवाने सूर्य व तारे निर्मिले त्यावेळेस देवाने दिवा व रात्र यांवर त्यांना प्रभुता दिली.
No comments:
Post a Comment