प्रेषितीय विश्वास मतांगिकार (The Apostles’ Creed) बायबलमध्ये आढळत नाही. तसेच प्रेषितीय विश्वास मतांगिकार (The Apostles’ Creed) प्रेषितांनी लिहिलेला नाही. उलट, हे सर्व प्रेषितांच्या मृत्यूनंतर किमान 150 वर्षांनी लिहिले गेले. याला प्रेषितीय विश्वास मतांगिकार (The Apostles’ Creed) म्हणतात कारण यात प्रेषितांनी काय शिकवले याची नोंद केलेली आहे. त्या काळामध्ये खोटे शिक्षणाची ओळख व्हावी म्हणून प्रेषितीय विश्वास मतांगिकार (The Apostles’ Creed) असणे आवश्यक होते.
प्रेषितीय विश्वास मतांगिकार (The Apostles’ Creed) खालीलप्रमाणे आहे:
मी देवावर विश्वास ठेवतो, सर्वशक्तिमान पिता,
स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता,
आणि येशू ख्रिस्तामध्ये, त्याचा एकुलता एक पुत्र, आपला प्रभु:
जो कुमारी मरियमच्या पोटी पवित्र आत्मा द्वारे जन्मला,
त्याने पोंटियस पिलातच्या द्वारे दुःख सहन केले गेले,
त्याला वधस्तंभावर खिळले गेले, तो मरण पावला आण त्याला गाडण्यात आले.
तो नरकात उतरला.
तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यांतून पुन्हा उठला.
तो स्वर्गात गेला
आणि सर्वशक्तिमान देवाच्या उजव्या हाताला बसलं,
जिथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी येईल.
मी पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, पवित्र (कॅथोलिक) वैश्विक मंडळी,
पवित्र जणांचा सहवास,
पापांची क्षमा,
शरीराचे पुनरुत्थान,
आणि अनंतकाळचे जीवन.
आमेन.
प्रेषितीय विश्वास मतांगिकार (The Apostles’ Creed) हा ख्रिस्ती सिद्धांताचा एक चांगला सारांश आहे.
या विश्वास मतांमध्ये कॅथोलिक हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याचा रोमन कॅथोलिक चर्चशी काही संबंध नाही. हा लॅटिन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ सार्वत्रिक, किंवा वैश्विक असा होतो या शब्दाद्वारे प्रारंभिक ख्रिस्ती इतिहासामध्ये प्रभू येशूच्या कृपेने ज्या विश्वसनाऱ्याचे तारण झालेले आहे त्या मंडळीला दर्शवण्यात येत होते.
प्रेषितांचा मतांगिकार यासाठीही महत्त्वाचा होता कारण पहिल्या दुसऱ्या शतकात अनेक खोटे सिद्धांत उदयास येऊन ख्रिस्ती मंडळीला संभ्रमात पाडत होते. यामुळे मंडळीला खऱ्या ख्रिस्ती सिद्धांताची एकरूप रेखा मिळाली. आणि ख्रिस्ती मंडळींचे होते सिद्धांत आणि खोट्या शिक्षकांपासून रक्षण झाले.
No comments:
Post a Comment