प्रेषितीय विश्वास मतांगिकारामध्ये (The Apostles’ Creed) विषयी आमची मागची पोस्ट वाचून अनेकांना एक प्रश्न पडला होता, त्याचीच चर्चा आपण आजच्या या पोस्टमध्ये करणार आहोत. तो प्रश्न पुढील प्रमाणे आहे:
प्रभू येशू नरकात गेला होता का?
हा एक जटिल प्रश्न आहे. वधस्तंभावरील त्याच्या मृत्यूनंतर प्रभू येशू नरकात गेला असा विश्वास मुख्यतः प्रेषितीय विश्वास मतांगिकारामध्ये (The Apostles’ Creed) आढळून येतो. ज्यामध्ये असे म्हटले आहे की तो "नरकात उतरला" जे प्रभू येशू "नरकात" जाण्याचे वर्णन करते. या विषयाचा अभ्यास करताना, बायबल मृत्यू नंतरच्या जीवनाबद्दल काय शिकवते हे प्रथम समजून घेणे महत्त्वाचे आहे.
इब्री शास्त्रवचनांमध्ये, मृतांच्या ठिकाणांचे वर्णन करण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे 'शिओल' हा होय. त्याचा सर्वसाधारण अर्थ "मृतांचे स्थान" किंवा "मृत आत्म्याचे/जीवांचे स्थान" असा आहे. नवीन करारातील शिओलचे ग्रीकचा समतुल्य शब्द 'हेड्स' आहे, जे “मृतांचे ठिकाण” हा अर्थ देखील सूचित करते. पवित्र शास्त्राच्या नवीन करारातील इतर वचने सूचित करतात की शिओल'/हेड्स ही एक तात्पुरती जागा आहे जिथे मनुष्य मेल्यानंतर त्यांची आत्मे अंतिम पुनरुत्थान आणि न्यायाची दिवसापर्यंत ठेवले जातात. मराठीत याला अधोलोक म्हणून संबोधले गेले आहे. याशिवाय प्रकटीकरण पुस्तकात सर्वकालिक नरक म्हणजे अग्नीचे सरोवर याचे वर्णन आढळते.
प्रकटीकरण 20:11-15 अधोलोक आणि अग्नीचे सरोवर यांच्यात स्पष्ट फरक करते. अग्नीचे सरोवर हे तारण ना झालेल्यांसाठी कायमचे आणि अंतिम न्याय दंडाचे ठिकाण आहे, येथे पापांबद्दल कायमची यातना भोगतील. तर “शिओल” ही तात्पुरती जागा आहे. पुष्कळ लोक (शिओल) अधोलोक आणि अग्नीचे सरोवर या दोन्हींचा उल्लेख "नरक" म्हणूनच करतात आणि यामुळे गोंधळ निर्माण होतो. येशू मृत्यूनंतर कायमच्य पीडेच्या ठिकाणी अर्थात अग्नीच्या सरोवरात गेला नाही, तर तो अधोलोकात अर्थात शिओल मध्ये गेला.
बायबल मध्ये (शिओल/हेड्स) या अधोलोकाचे दोन ठळक विभाग आहेत - आशीर्वादाचे स्थान ज्याला सुखलोक म्हंटले गेले आहे आणि न्याय दंडाचे स्थान (मत्त 11:23; 16:18; लूक 10:15; 16:23; प्रे. कृत्ये 2:27- 31). तारण पावलेल्या आणि पापांत असणाऱ्या लोकांच्या निवासस्थानाला बायबलमध्ये सामान्यतः "शिओल" असे संबोधले जाते. अर्थात हे तारण पावलेले लोक प्रभू येशूच्या बलिदानापूर्वीचे आहेत. तारण पावलेल्या लोकांच्या निवासस्थानाला लूक 16:26 मध्ये "अब्राहमचे उर" असेही म्हटले जाते. तारण न पावलेल्या लूक १६:२३ मध्ये "आधोलोक" असे संबोधले आहे. तारण पावलेल्या आणि तारण न पावलेल्या लोकांची राहण्याची ठिकाणे "मोठी दरी" (लूक 16:26) द्वारे विभक्त केली जातात. जेव्हा येशू मरण पावला, तेव्हा तो शीओलच्या सुखलोकाच्या बाजूस गेला आणि मग तेथून, विश्वासणाऱ्यांना त्याच्याबरोबर स्वर्गात घेऊन गेला (इफिस 4:8-10). पण शिओल/हेडीसमध्ये दंडाच्या स्थानात कोणताही बदल झाला नाही. सर्व अविश्वासू मृत लोक त्यांच्या भविष्याच्या अंतिम न्यायाची वेळ येईपर्यंत शिओल अर्थात अधोलोकात ठेवले जातात. आणि न्यायानंतर अधोलोक अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. प्रकटी 20:14, "तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय."
प्रभू येशू अधोलोकात गेला होता का? इफिस 4:8-10 आणि 1 पेत्र 3:18-20 नुसार, उत्तर होय आहे. ते नरक म्हणजे शेओल/हेड्स अर्थात अधोलोक जेथे जुन्या करारातील संत अर्थात तारण पावलेले लोकं अब्राहम याच्या उराशी म्हणजेच सुखलोकांत ठेवली गेली ते स्थानात गेला.
स्तोत्र 16:10-11 सारख्या उताऱ्यांमधूनही काही संभ्रम निर्माण होतो कारण तेथे अधोलोकचे (शिओल)अनेक भाषांतरात नरक म्हणून भाषांतरित केले आहेत, "स्तोत्रसंहिता 16:10
"कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस;"
या वचनात शिओल अर्थात अधोलोक याचा संदर्भ कबरेशी आहे. येशूने वधस्तंभ असताना त्या चोरास सांगितले 'तू आजच माझ्याबरोबर सुखलोकात असशील (लूक 23:43); तो त्याला असे म्हणाला नाही, "मी तुला नरकात भेटेन." जेव्हायेशू मृत पावलात्यानंतर त्याचे शर थडग्यात ठेवण्यात आले होते; पण त्याचा आत्मा/आत्मा शीओल/हेडीस म्हणजेच अधोलोकात गेला.
दुर्दैवाने, बऱ्याच बायबल भाषांतरांमध्ये अनुवादकांनी “शिओल,” “हेड्स” आणि “नरक” या हिब्रू आणि ग्रीक शब्दांशी सुसंगत किंवा त्यांचे योग्य भाषांतर केले नाही. काही लोकांचे असे मत आहे की आपल्या पापांची अधिक शिक्षा भोगण्यासाठी येशू नरकात गेला किंवा शीओलच्या यातनेच्या ठिकाणीं गेला. ही कल्पना बायबलच्या शिकवणीशी पूर्णपणे विसंगत आहे. वधस्तंभावरील येशूचा मृत्यू आणि आपल्या पापाच्या बद्दल दुःख भोग यामुळेच आपल्या तारणासाठी पुरेशी तरतूद झालेली आहे. हे त्याचे सांडलेले रक्त होते ज्यामुळे आपली स्वतःची पापे धुतली गेली (योहान 1:7-9). जेव्हा तो वधस्तंभावर टांगला गेला तेव्हा त्याने संपूर्ण मानवजातीच्या पापाचे ओझे स्वतःवर घेतले. तो आपल्यासाठी पाप बनला: “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे." (2 करिंथ 5:21). जेव्हा येशू मृत्यूच्या अगदी जवळ होता, तेव्हा तो मोठ्याने ओरडला, "पूर्ण झाले" (योहान 19:30) त्याचा आत्मा अधोलोकात पाठवला गेला होता " तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हा अधोलोकात यातनेच्या ठिकाणी गेला नाही. तर अब्राहमच्या उराशी अर्थात सुखलोकात गेला. येशू ख्रिस्ताचे मृत्यू, आणि पुनरुत्थानाद्वारे त्याने आमच्या तारणाचे कार्य पूर्ण केले.
सारांश:
प्रेषितिय विश्वास मतांगीकार यामध्ये नरक या शब्दाचा संदर्भ अधोलोकेशी आहे. आणि म्हणून जर हा प्रश्न येतो की येशू ख्रिस्त हा नरकात गेला होता का? तर याचे उत्तर नाही अशी येते परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा आधोलोकात उतरला आणि ते स्थान यातनेचे स्थान नव्हते, तर ते अधोलोकातील दुसरा विभाग अर्थात सुखलोक होते. ज्याचे स्पष्टीकरण आपण वर केलेलेच आहे.
No comments:
Post a Comment