‘विश्वास’ ही देवा द्वारे मिळालेली देणगी आहे की ‘तारण’ हे देणगी आहे?
कॅलविनिस्ट इफिस 2:8 चे संदर्भ देऊन 'विश्वास देणगी आहे ' हे शिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. तर चला तो संदर्भ नीट वाचूया...
कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे;
इफिसकरांस पत्र 2:8
इफिस २:८ वचन काय सांगते? चला त्या वचनाला संदर्भासहित पाहूया..
काही प्रश्न विचारू (संदर्भ शोधण्याच्या नियमानुसार काय, कसे, केव्हा, का, कोणी इत्यादी प्रश्न उत्पन्न करून) आपण वचनात जे आहे त्याला धरुनच प्रश्न उपस्थित करूया.
देवाच्या कृपेने काय झालेले आहे?
तारण (या प्रश्नाचे उत्तर विश्वास होऊच शकत नाही)
अर्थात मनुष्याला देवाच्या कृपेने काय मिळाले तर तारण मिळाले आहे.
तुमच्या हातून हे झालेले आहे का?
नाही
काय तुमच्या हातून झालेले नाही?
तारण (येथे ही उत्तर विश्वास होऊच शकत नाही)
का ते आमच्या हातून होऊच शकत नाही?
कारण हे देवाचे दान आहे. (तर हे देवाचे दान आहे). 'तर' हा शब्दा कारण दर्शक शब्द आहे. 'झालेले ' हा शब्द पूर्ण क्रियापद आहे हे सांगते की 'तारण हे आमच्या हातून झालेले नाही तर ते देवाचे दान आहे.'
आणि देवाचे हे दान ' तारण ' आपल्याला कसे मिळाले?
विश्वासाच्या द्वारे (फक्त याच प्रश्नाचे उत्तर हे विश्वास हे आहे)
सर्व संदर्भ व व्याकरण तपासून पाहिल्यास हेच कळते की 'हे देवाचे दान आहे ' हे विश्वासाला दर्शवत नसून तारणाला दशवते. देवाचे दान हे तारण आहे, विश्वास नाही. तर विश्वास हा ते तारण स्वीकारण्यासाठी लागणारा प्रतिसाद आहे.
हे सर्वसाधारण व्याकरण जाणणारा सातवीच्या व्यक्ती ही समजेल की 'हे देवाचे दान आहे ' ते तारणाला म्हंटलेले आहे. आणि पवित्र शास्त्राचे भाषांतर करणारे मूळ ग्रीक भाषेचे व्याकरण जाणतात म्हणूनच त्यांनी ही व्याकरणानुसारच भाषांतर केलेले आहे. काही इतर भाषांतरे पाहूया...
For it is by grace [God’s remarkable compassion and favor drawing you to Christ] that you have been saved [actually delivered from judgment and given eternal life] through faith. And this [salvation] is not of yourselves [not through your own effort], but it is the [undeserved, gracious] gift of God;
Ephesians 2:8 AMP
या भाषांतरात ही पण स्पष्ट कळते की salvation देवाचे दान आहे....
When you believed in Jesus, God saved you because he is very kind. You could not save yourselves, but that is God's gift to you.
Ephesians 2:8 EASY
हे सर्व मान्य बाइबलचे भाषांतर आहेत. ही बाइबलची भाषांतरे करणारी विद्वान आणि ग्रीक भाषा व त्याचे व्याकरण जाणणारे लोक होती, ती कशी काय चूक करू शकतात.
माझ्या पाहण्या नुसार बहुतेक कॅलविनिस्ट संदर्भ लक्षात घेत नाहीत, ते फक्त त्यांच्या दृष्टिकोनाचे शब्द पकडून स्वत:ची परिभाषा त्या शब्दावर थोपवून वचनाचा स्वतःचे सिद्धांत शिकवण्याचा प्रयत्न करतात.
म्हणुन कॅलविनिस्ट इफिस २:८ चे संदर्भ देऊन 'विश्वास देणगी आहे ' हे शिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात तो किती आधारहीन आहे.
तो आधारहीन कसा आहे हे अजुन आपण खालील काही उदाहरणावरुन पाहुयात.
उदा 1
राजेंद्र हा अत्यंत गरीब मुलगा होता त्याची शाळा खूप दूर होती त्याला शाळेत जाण्यासाठी सायकलची गरज होती, परंतु त्याची आर्थिक परिस्थितीमुळे त्याला ती खारिदी करता येत नव्हती. त्याची स्थिती पाहून एका शिक्षकाला त्याची दया आली. आणि त्यांनी त्याला (दयेने) सायकल दिली. आणि ही सायकल त्याने घेतली. ती सायकल त्याने कोणत्याही केलेल्या कामा बद्दल, ज्ञाना बद्दल मिळाली नव्हती तर ती सायकल त्याला सरांकडून मिळालेली देणगी होती. जिचा त्याने स्वीकार केला. ती सायकल स्वीकरल्या बद्दल मी कधापि गर्व करणार नाही कारण तसा गर्व करायला जागा ही नाही. तसेच तारण प्राप्त करण्यासाठी जो प्रतिसाद लागतो तो म्हणजे आपला विश्वास आहे. ही मनुष्याद्वारे होणारी प्रतिक्रिया आहे.
उदा 2
जर कोणी माझी आर्थिक परिस्थिति मला कोणीतरी मोठ्या रकमेची मदत केली. ती रक्कम त्यांनी धनादेश किंवा चेकच्या स्वरुपात केली. ही त्याव्यक्तीने माझ्यावर केलेली कृपा ठरेल. तो चेक मी स्विकारला आणि बँकेत जाऊन डिपॉझिट केला. यात ही मला चेक स्वीकारून बॅकेत डिपाझिट केल्याचा गर्व का बरे होईल. कारण माझी सुटका ही चेक स्वीकारल्या मुळे किंवा माझ्या प्रतिसादामुळे नव्हे तर तो चेक देणार्याच्या कृपेमुळे झाली आहे. म्हणुन विश्वास ठेवण्याच्या प्रतिसादाबद्दल अभिमान बाळगणे आणि तसा दावा करने अशक्य गोष्ट आहे. आणी कॅल्विनिस्ट जो निर्वाळा देतात त्यात कोणताच तर्क दिसुन येत नाही.
त्याच प्रकारे देव त्याच्या कृपेद्वारे जे तारण देतो ते आपण केवल विश्वासाद्वारे स्वीकारतो किंवा प्राप्त करतो...
स्वत: जॉन कॅल्वीन आपल्या भाष्य ग्रंथात तेच नमुद करतात..
First, he asserts, that the salvation of the Ephesians was entirely the work, the gracious work of God. But then they had obtained this grace by faith. On one side, we must look at God; and, on the other, at man.
जॉन कॅल्विन स्व:ता त्यांच्या भाष्यग्रन्थात नमुद करतात की मनुष्य हा विश्वासाने तारण प्राप्त करतो. पुढे ते लिहतात
Many persons restrict the word gift to faith alone. But Paul is only repeating in other words the former sentiment. His meaning is, not that faith is the gift of God, but that salvation is given to us by God
येथे ते स्पष्ट करित आहेत की विश्वास ही देणगी नाही तर तारण ही देणगी आहे... याचे कारण ते त्यांच्या फूटनोट मध्ये ही देतात.
"Kai touto ouk ex humon. It has been not a little debated, among both ancient and modern commentators, to what noun touto should be referred. Some say, to pistoes; others, to chariti; though on the sense of pistis they differ in their views. The reference seems, however, to be neither to the one nor to the other, but to the subject of the foregoing clause, salvation by grace, through faith in Christ and his gospel; a view, I find, adopted by Dr. Chandler, Dean Tucker, Dr. Macknight, and Dr. A. Clarke. And to show that this interpretation is not a mere novelty, I need only refer the reader to Theophylact, who thus explains: Ou ten pistin legei doron Theou alla to dia pisteos sothenai touto doron esti Theou. He does not say that faith is the gift of God; but to be saved by faith, this is the gift of God.' Such also is the view adopted by Chrysostom and Theodoret."
पवित्र शास्त्रात विश्वास ठेवण्याचे आव्हाहन देण्यात आले आणि समोरच्यात विश्वास आहे की नाही ह्याची पडताळणी करण्यात आली आहे.
इब्री 11:6
आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.
प्रेषित 16:30-31
आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?”
ते म्हणाले, “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”
प्रेषित 8 : 37
फिलिप्पाने म्हटले, “जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.” त्याने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.
रोम 10: 8-9
“येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.कारण जो अंत:करणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते” ('तु' हे सर्वनाम लक्षात घ्या)
वरिल सर्व वचने ‘समोरच्या व्यक्तीला विश्वास ठेवण्याचे’ आव्हान करित आहेत हेच आपणाला दिसुन येते. आणि एवढेच नाही तर संपुर्ण जुन्या ते नविन करारात आपल्याला हेच दिसुन यईल.
जर विश्वास ठेवणे मनुष्याला अशक्य असते तर वरिल वचने देवाचा आत्म्याद्वारे दिली गेलीच नसती. विश्वास ठेवणे हा मनुष्याद्वारे देवाने तारणासाठी जो उपाय केला त्याला स्विकारण्याचा प्रतिसाद आहे.
विश्वास आणि कर्म एक नाहीत.
‘विश्वास ठेवणे जर मनुष्याच्या बाजुने होते तर ते कर्म ठरते आणि त्याविषयी तो अभिमान बाळगु शकतो. तारण हे मानवी कर्मावर निर्भर आहे हे यातुन शिकवले जाते’ हा एक प्रसिध्द तर्क कॅल्विनवादी लोक देतात.
सर्व प्रथम आपण पाहिलेच की विश्वास मनूष्याचा प्रतिसाद आहे. आणि बाइबल कर्म आणि विश्वास या दोघाना विरोधाभासी असेच दर्शवते... उदाहरणार्थ
नीतिमत्त्व एक तर कर्माने मिळते किंवा विश्वासाने मिळते. परन्तु कर्माने नीतिमत्व मिळवने मानवाला अशक्य आहे. म्हणुन आपल्याला नीतिमत्व मिळावे म्हणुन देवाने ख्रिस्ताला पुढे केले. ज्याने नियमशास्त्रानुसार आमच्यासाठी बलिदान केले. आणि देवाने असे केले की त्याने केलेल्या कार्यावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो आपण आपण नीतिमत्त्व प्राप्त करतो.
वाचा रोम 10:4
कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे.
रोम 3:21-22, 28
आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्त्व ते प्रकट झाले आहे; त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे;
हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही.
नियमशास्त्रातील कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो.
येथे विश्वास ठेवणार्या हा शब्द आपण पाहतो ज्याविषयी आपण मागच्या मुद्द्यात पाहीले आहे. हा मनुष्याचा तारण प्राप्त करण्यासाठी लागणारा महत्त्वपूर्ण प्रतिसाद आहे.
आणि म्हणुन विश्वास ठेवणे आणि ती देणगी नसुन मानवी प्रतिसाद आहे असे म्हणणे कुठेच मानवी कर्म ठरत नाही. कारण वचनात देवच तशी अपेक्षा करतो हे स्पष्ट आहे. तसेच विश्वास ठेवणे हे कर्म नाही हे ही वचनाद्वारे आपल्याला स्पष्ट झालेले आहेच.
आपल्याला वरिल सर्व प्रतिवादातुन स्पष्ट झालेच असेल की विश्वास ‘देणगी’ आहे कॅल्विंनवादी लोकांचे बायबल आधारा शिवाय असलेले मनुष्य निर्मित शिक्षण आहे आणि ते बायबलच्या शिकवणीच्या विपरित आहे. तरीही आपले काही प्रश्न असल्यास आम्हाला जरुर कळवा.
No comments:
Post a Comment