Saturday, June 5, 2021

यरीहो शहराचे पुरातत्व पुरावे

यरीहो शहराचे पुरातत्व पुरावे

पवित्र शास्त्रानुसार कनानमध्ये प्रवेश केल्यानंतर यार्देन नदी ओलांडताच इस्राईलने आक्रमण केले ते पहिले शहर होते यरीहो शहर.

पुरातत्व पुराव्यांनुसार ते एक अतिशय प्राचीन शहर होते. पुरातत्वशास्त्राच्या आधारे या शहराची तारीख इ.स.पू. 1400 वर्षे जुने. शहराभोवती मजबूत तटबंदी होती. पुरातत्व

उत्खननात असे दिसून आले आहे की तट्बंदीची ही भिंत 430,000 फूटांपर्यंत पसरली होती. 11.8 फुट उंच आणि 5.9 फूट रुंद. काही ठिकाणी भिंत 28 फूट उंच होती आणि तर काही ठिकाणी 30 फूट रुंद दगडी मनार देखील होते, त्यावर चढण्यासाठी सीड्या बनवलेले होते.

या शहरावर विजय मिळवण्यासाठी, इस्राएली लोकांनी देवाच्या आज्ञेनुसार सहा दिवस शहराभोवती फेरी घातली आणि सातव्या दिवशी त्यांनी सात वेळा रणशिंग फुंकले व आरडाओरडा केला आणि भिंतीचा पाया कोसळून पडला. इस्राएल लोकांनी हे शहर जिंकले. (जोशुआ अध्याय)) हा कार्यक्रम पुरातत्वशास्त्र वर आधारित होता 1240 ए. पू सांगितले जाते. हे शहर उध्वस्त करुन यहोशवाने शापही जाहीर केला. जेव्हा हील नावाच्या व्यक्तीने हे शहर पुन्हा वसवले तेव्हा हा शाप त्याच्या आयुष्यात खरा ठरला. (१ राजे 16:34 आणि यहोशवा 6:26)

नवीन कराराचे यरीहो शहर आणि जुना करारचे शहर वेगवेगळे आहेत, ते जवळजवळ एक किलोमीटरच्या फरकाने वसलेले होते. प्रभु येशू ख्रिस्ताच्या काळातील हे यरीहो महान राजा हेरोद याने बांधलेले होते.

ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञ कॅथलीन केन्यन यांनी आधुनिक पद्धतीने 1950 मध्ये पुन्हा उत्खनन केले. ज्यामध्ये त्याला आढळले की प्राप्त झालेल्या वीटा ह्या भिंतीचाच भाग आहेत. बायबलसंबंधी वर्णनानुसार (यहोशवा 6:20). "मग त्यांनी शहराला आणि त्यातील सर्व काही पेटवून दिले" (यहोशवा 6:24). पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननात देखील भीषण आग लागल्याचे पुरावे सापडलेले आहेत. कॅथलिन केन्यन यांच्या म्हणण्यानुसार
'हे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले. भिंती आणि फरशी आगीपासून काळी किंवा लाल झाली होती आणि प्रत्येक खोली पडलेल्या विटा, इमारती लाकूड आणि दैनंदिन वापरण्याच्या वस्तूंनी भरली होती. जवळजवळ सर्व खोल्यांमध्ये मोडतोड प्राप्त झाल्याचा पुरावा मिळाला आहे. शहराची उत्तरेकडील भिंत संरक्षित होती, सर्व बाजूंनी उर्वरित भिंती कोसळल्या 

होत्या. उत्तरेकडील भिंतीमध्ये राहाब (कनानी वेश्या ज्याने इस्राएलच्या हेरांना लपवून ठेवले होते) वेश्या यांचे घर सापडले. जे चमत्कारीकरित्या जतन केले गेलेले आहे.

1997 मध्ये दोन इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांनी एक छोटी मोहीम राबविली. पॅलेस्टाईन पुरातत्व विभागाच्या अंतर्गत, लोरेन्झो नेग्रो आणि निकोल मॅशेट्टी यांनी सुमारे एक महिना उत्खनन केले आणि कॅथलिन केन्यन यांनी अपूर्ण सोडलेल्या खंदनात काम केले. आणि कोणत्याही प्रकारचे पुरावे न मिळाल्याबद्दल स्वीकारले. यामागील मुख्य कारण म्हणजे पॅलेस्टाईन अधिका-यांना यहूदी लोकांचे कनेक्शन या ठिकाणी जोडले जावेसे वाटत नव्हते. डॉ. ब्रॅन्डट बड यांनी सांगितले की यरीहो येथे तीन वर्षांत मोठ्या मोहिमे अंतर्गत उत्खनन केले गेले, त्यामध्ये गारस्टंग (1430-193) केथलीन केन्यॉन (1952-1958) आणि बायबलवर आधारित पुराव्यांची पुष्टी केली गेली आहे. जर्मनीच्या पुरातत्वशास्त्रज्ञ सेलिन, कार्ल वॅटझिंगर इत्यादींनी आगीमुळे शहर नष्ट होण्याच्या पुष्कळ पुरावे अस्तित्वात असल्याची पुष्टी केली.


संदर्भ: 

1.मुळ लेखक- पौल जॉनसन  आर्कियोलॉजी अंड बाइबल 

2. छायाचित्र: पोपुलर हन्ड्बूक ऑफ अर्कियोलोजी ऑफ बाइबल, विकिपेडिया, बाइबल आर्कियोलॉजिकल रिपोर्ट. 

 

No comments:

Post a Comment