Friday, June 4, 2021

बलाम संदेष्टा संबंधी पुरातत्व सबुत व उज्जीया राजाच्या काळात झालेल्या भुकंपाचे पुरावे


बौराचा बलाम पुत्र बलाम (गणना 24:3) एक संदेष्टा होता, ज्याला मवाबाच्या राजा बलाक याने इस्राएल प्रजेस श्राप देण्याकरिता बोलावले। जेव्हा तो श्राप देण्यास असफल झाला, त्याने बलाकास एक सल्ला दिला त्यानुसार मवाबच्या राजाने आपल्या देशातील कन्यांस इस्राएलच्या प्रजेत पाठ्वुन त्याना परिक्षेत पाडले. इस्राएल मधील परुषांनी त्या स्त्रियांच्या मागे लागुन व्याभिचार केला व बालपौर देवतांची उपासना करु लागले. ज्यामुळे देवाचा कोप त्यांच्यावर भडकला. पवित्रशास्त्रात त्याच्या दूष्टतेचे वर्णन अनेक ठिकाणी केलेले आहे.(गण.25:1-2/31:16. अनु 23:4,5; यहुदा 1:11, 2 पेत्र 2:15, प्रग.2:14)

उज्जियाच्या काळातील भुकम्प

.स.1967 मध्ये जॉर्डन देशाम्ध्ये दईर अला नावाच्या स्थाअनी एक उत्खनन झाले, त्यामध्ये एकशे एकोणवीस खंडामध्ये, खंडीत अवस्थेत एक पलस्टर युक्त लेख सापडला जो अरेमिक भाषेत होता. हा भुकंपात उध्वस्त झालेल्या इमारतीच्या भिंतीचा होता. शोधकर्त्याच्या परिक्षणानुसार भुकम्पाचा काळ ई.स.पू. 760 होता जेव्हा उज्जीया यहुदाचा राजा होता व आमोस जख-या यांनी भविष्यसंदेश दिले। (जख 14:5 आमोस1:1)

बलाम संदेष्ट्याचा उल्लेख

प्राप्त पलस्टर लेख हा पन्नास ओळींचा असुन काळ्या शाइने त्यावर लिहलेले होते, पहिल्या चार ओळींमध्ये बलाम संदेष्ट्याचा तीन वेळा उल्लेख आढळतो. त्यात लिहलेले आहे की बौरचा पुत्र बलामची चेतावणी, जो देवाचा द्रष्टा होता. या लेखात व गणना पुस्तकातील विवरणात बरीच समानता आहे. तसेच या लेखात पथोर नगराचा उल्लेख ही आढळतो गणना 22:5 मध्ये हेच आपण वाचतो.  


संदर्भ: 

1. आर्कियोलॉजी अंड बाइबल (पौल जॉनसन) 

2. पॉपुलर हंड्बूक ऑफ आर्कियोलॉजी ऑफ बाइबल

3. फोटो क्रेडिट: विकिपेडिया 


No comments:

Post a Comment