या पुरातन शहरांविषयी व त्यांच्या नाशाविषयी आपल्याला नेहमी कुतुहल असते. खरेच असे कोणते शहर होते का ज्यांचा नाश अग्नि आणि गंधकाच्या वर्षावाने झाला आहे?
सदोम आणि गमोरा या शहरांची स्थान निश्चिती:
पुरातत्व विद्वानाचे यांविषयी अनेक मते आहेत, ते मृत समुद्राच्या आसपास दोन ते तीन जागेसबंधी स्थान निश्चिती करतात. जर आपण जवळुन पाहिले तर लक्षात यईल हे सर्व भाग विध्वंशात नष्ट झालेला आहे. आणि बरेच से बायबलचे पुरातत्व विदवान या निष्कर्षास पोहचले आहेत की ते स्थान खालील स्थानांपैकी एक असु शकते.
1. बाब इध-ध्रा
पुरातत्व विदवान पौल लॅप्प 1960 मध्ये व 1973 मध्ये वॉल्टर रास्ट आणि
थॉमस स्कब यांनी या शहराविषयी पुरावे प्रस्तुत केले, त्यांच्या मते,
हे
शहर योजनापूर्वक बनवलेले होते, जेथे कब्रस्थान, इमारती, घरे,
इत्यादि
वरून कळते की एक सांस्कृतिक शहर होते, या शहराच्या अवशेषावरुन हे शहर मोठ्या
अग्निकाण्डात नाश पावले हे कळते, जरी है शहर पवित्रशास्त्रात वर्णन
केलेल्या जागेच्या आसपास असले तरी ते उत्पती 13:1-12 मध्ये केलेल्या वर्णनाशी मेळ
खात नाही. तरीही हे शहर सदोम आणि गमोरा यांच्या सबोत नाश पावलेले होते हे कळते.
2. ताल एल-हम्माम
शतकोनुशतके उजाड पडलेले शहर
या शहर सदोम व गमोराचे शहर असु शकते याचे सर्वाधिक प्रमाण उपलब्ध आहेत. कारण मध्य कास्य युग (1800-1550 ई.स.पू) नंतर या शहराच्या व्यवसाय व व्यव्हारिक घडामोडींमध्ये आपण एक मोठे अंतराळ पाहण्यास मिळते. एवढी वर्षे किंवा शतके हे शहर असे उजाड का पडलेले असु शकते. मोशे व यहोशु या भागाला उजाड भूमि म्हणुन वर्णन करतो, (गण 21:20) कास्य युग (1550-1200 ई.स.पू) ते लोह युग (1200-1000) पर्यंत हे शहर असेच उजाड होते. या शहराचे पुनःनिर्माण सालोमन राजाच्या वेळेस केले गेले।
भयानक विध्वंशाचे पुरावे
येथे प्रचंड विध्वंशाचे पुरावे मिळालेले आहेत, जवळजवळ एक मिटर जाड राखेचा थर येथिल मातीत पहावयास मिळतो. घरांचे छप्पर, भिंती, किलेबंदी, व्यक्तिगत, वस्तु, जसे दागिने, उपकरणे, मातीचे भांडे,
वास्तुशिल्पे इ. आगिच्या भयानक विध्वंशात सापडुन नष्ट झाले, एवढेच नव्हे, मानवी अवशेष देखील याचे पुरावे देतात.वैज्ञानिक लोकांच्या परिक्षणावरुन येथे अणुबाम्ब द्वारे निर्मित उर्जे एवढी उर्जा उत्पन्न होऊनच अशा विध्वंश संभव आहे हे कळते.
त्याच सोबत हे शहर उत्पती 13:1-12 मध्ये वर्णन केलेल्या शहराशी व स्थानाशी मेळ खाते.
1. हे यार्देनच्या खो-यात आहे
२. जो बेथेलमधून स्पष्टपणे दिसतो.
3. यार्देनच्या मैदानात आहे
4. हा भाग परमेश्वराच्या बागेसारखा आहे, पाणी भरपूर आहे.
6. ते कनानच्या सीमेवर आहे.
7. बेथेल पूर्वेकडील
या परिसरात मिळालेल विशाल कब्रस्थान
पुरातत्व अभ्यासक पॉल लॅप यांनी यापरिसराचा शोध घेतला असता
, त्यांना
तेथे मोठ्या संख्येने ‘शाफ्ट’ कबरे सापडले
आहेत. ही कब्रे जमीनीत एका लहान खोलीसारखी आहे. अशा कब्रा 20000 पेक्षा जास्त
आहेत. प्रत्येक थडग्यात किमान 1-6 मृतदेह सापडले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात
(चार्नेल) घरे सापडली आहेत. या कबरांमध्ये मानवी हाडांची रचना आणि इतर वस्तु
मोठ्या प्रमाणात आढळल्या आहेत. या थडग्यांमधून सुमारे 3,000,000 मातीची भांडी
सापडली आहेत. येथे सापडलेला पुरावा आणि त्यांची तारीख पवित्र शास्त्रात वर्णन
केलेल्या सदोम आणि गमोराच्या इतिहासाशी संबंधित आहे. अशाच अन्य कबर मृत
समुद्राच्या बायबलसंबंधी विभागांमध्ये सापडल्या आहेत, जसे की
बाब-इध-ध्राजवळील नुमेरिया आणि खानझिरमध्ये.
संशोधनानुसार, बाब-इध-ध्राच्या स्मशानभूमीत सुमारे 500,000 लोकांचे मृतदेह असल्याची पुष्टी केली गेली आहे. तसेच नुमेरिया आणि खानझिरमध्ये समान संख्येने लोक दफन केले जाण्याची शक्यता आहे. मृत समुद्राच्या या संकुलात 1,500,000 मृतदेह सापडले आहेत. हे सर्व मृत्यू 100 वर्षाच्या काळात झाल्याची पुष्टी केली गेली आहे.
उत्प 19:24 नुसार स्वर्गातून अग्नि व गंधक यांचा वर्षावाने विध्वंश
झाल्याची पृष्टी झाली आहे. हे सर्व मृत्यू भीषण आगीत नष्ट होण्याचे पुरावे बनले
आहेत.
लेख संपादन: संदिप कांबळे
संदर्भ:
1. पोपुलर हॅन्डबूक ऑफ बिब्लिकल आर्कियिलॉजी
No comments:
Post a Comment