पेत्रला शिष्य होण्याकरिता पाचारण करण्यापूर्वी त्याने जो चमत्कार केला तो ही नावेत बसुनच केला, त्याचे वाक्य आमच्या प्रत्येकाच्या तोंडपाठच आहे, 'खोल पाण्यात हाकार' लुक 5:4 तो नावेत (मचव्यात) असताना वादळ आले, ते ही त्याने शांत केले. (लुक 8:22-25)
खाली चित्रात दिसणारी नौका ही गलील सागराच्या चिखलातुन वर काढण्यात आली आहे, ही नाव 1986 मध्ये सापडली असुन पुरातत्व शोध-पडताळणी नुसार ही नाव प्रभू यीशूच्या समकालिन आहे हे सिद्ध झाले आहे.
या शोधाद्वारे प्रभु येशूच्या काळात नव्याकरारात नमुद केल्याप्रमाणे प्रगत नाव व मासेमारीचा व्यवसाय प्रचलित होता हे प्रमाणित झाले आहे.
Endnotes:
- BAR - Top Ten Discovery Of New Testament
- Image Credit BAR (https://biblearchaeologyreport.com)
No comments:
Post a Comment