Tuesday, June 1, 2021

दाविदाच्या अस्तित्वाचा पुरावा आणि यहुदाच्या राज्यासंबंधी पुरावे

1980 ते 1990 च्या काळात युरोपमध्ये असे काही विद्वान उदयास आले ज्यांनी पवित्र शास्त्राच्या सत्यतेवर (विशेषत: किमानवादी आणि संशोधनवादी) दाविद व शलमोन यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून काल्पनिक कथेचा भाग असल्याचे नमूद केले. तसेच, अब्राहम, मोशे, निर्गम, यहोशवा आणि पैत्रयुद्धांवरील त्याच्या विजयावरही या लोकांचा वाद-विवादांद्वारे हल्ला झाला.
1993 मध्ये, हिब्रू युनियन कॉलेजच्या अवरहम बीरान यांना तेल-दान उत्तर इस्राएलमधील उत्खननात एक शिलालेख सापडला, तो इ.स. ई 9 व्या शतकातील आहे. ज्यावर अरामी भाषेत लेख लिहिलेला सापडला, त्यात दाऊदच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यावर 'दाविदचे घर' हा शब्द लिहिलेला आहे. यासह, मेशा स्तंभाच्या शिलालेखाप्रमाणे अनेक स्तंभ शिलालेख सापडले आहेत, ज्यावर हाच शब्द 'दाविदचे घर ' लिहिलेला आढळला आहे. इस्त्रायली किंवा पॅलेस्टाईन सीमेवर खिरबेत कय्यापा येथे उत्खनन केल्याने हे सिद्ध झाले की यहूदाच्या राज्याची (दक्षिण इस्राएल) 10 ते 11 शतकापर्यंतची वाढ झाली होती.
या शोधांमुळे दाविद आणि त्याच्या राज्य याच्या अस्तित्वावरचा वादविवाद थांबला.

#इस्राएल #जुन्या‌‌_करारा_संबंधी_पुरावे #दाविद #यहुदा_राज्य

Endnotes:
1. Evidence for Truth Vol-2 
2. Popular handbook for Biblical Archaeology 
3.Image: BAR - https://biblearchaeologyreport.com

No comments:

Post a Comment