उत्पत्ती 14:17-20
'कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे ह्यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला. आणि शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला; हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला असा आशीर्वाद दिला : “आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो; ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला. '
या
रहस्यमय व्यक्तीविषयी असा क्वचित कोणी ख्रिस्ती असेल
ज्याला ठाऊक नसेल, मलकीसेदेक राजा आणि याजक या नात्याने पवित्र शास्त्रात त्याचा उल्लेख
तीन वेळा आहे. पहिला उल्लेख उत्पती मध्ये आहे जेव्हा तो विजयी अब्राहमला भेटायला
येतो, दुसरा स्तोत्र 110:4 मध्ये 1000 वर्षांनंतरचा ज्यामध्ये ख्रिस्त येशूविषयीची भविष्यवाणी
आहे. जी वधस्तंभावर प्रभु येशूच्या बलिदाना नंतर 1000 वर्षानी पूर्णॅ झाली आहे. इब्री 7: 1-२8 इब्री कराचे पत्र याचा लेखक प्रभु येशूचे याजकत्व सिद्ध करतो.
बायबलमध्ये वर्णन केलेल्या या घटनेसंदर्भात ठाम पुरावे आहेत. ऑक्सफोर्ड अॅशमोलिन लायब्ररीमध्ये टैबलेट असून त्यात जलप्रलय नंतरचे पुरावे मिळतात, त्यात असे नमुद केलेले आहे की त्या दिवसात उत्पन्नाचा दहावा भाग देण्याची प्रथा प्रचलित होती. पुरातत्व संशोधकांचा विश्वास आहे की ही परंपरा ई 3400 पूर्वीपासुन प्रचलित आहे.1
आर्किझोलॉजिस्ट एली शुक्रॉन ज्याने दाऊद नगरात पुरातत्व शोधात बराच वेळ
घालवला आहे, तेव्हा मल्कीसेदेक अब्राहमला भेटला तेव्हा प्रत्यक्षात असलेल्या
मंदिराला त्यानी प्रकाशात आणले. या मंदिराची रचना आणि पुरातत्व शोधकर्त्यान
मंदिराची जी रचना मिळाली आहे ती उत्पत्ति 14:17-20 च्या वृतान्ताशी सुसंगत आहे.
मंदिराच्या
अवशेषात जी रचना सापडली आहे, तेथे
एक वेदी आहे जिच्यावर प्राण्यांचे बलिदान केले जात होते ती जागा, रक्त वाहुन जाण्यासाठी नाले, एका ठिकाणी द्राक्षरस तयार करण्यासाठीचे
कुण्ड , ऑलिव्ह ऑईल
बनवण्याची व्यवस्था इ. दिसुन येते.2
हा शोध पवित्र शास्त्रातील अब्राहम विषयी महत्त्वपूर्ण मानला जातो. पवित्र शास्त्रातील कुलाधिपती विषयी व त्यांच्या अस्तित्वाविषयी जे शंका उपस्थित केले जात होते त्यांना याद्वारे उत्तर मिळाले।
#उत्पत्ती #मलकीसदेक #अब्राहम
#जुन्या_करारा_संबंधी_पुरावे #दाविद #यहुदा_राज्य
Endnote:
1. Evidence for Truth - Vol 2
2. https://www1.cbn.com/cbnnews/israel/2019/july/archaeologist-says-a-stone-pillar-in-the-city-of-david-is-where-abraham-met-melchizedek
No comments:
Post a Comment