Tuesday, June 1, 2021

इतिहास

ह्या विषयांर्तगत आपण पवित्रशास्त्र आणि ख्रिस्ती इतिहासाविषयी जाणुन घेऊयात, खास करुन 

1. जुन्याकराराचा इतिहास 

2. मंडळीचा इतिहास 

3. दोन्ही करारांच्या दरम्यायांचा इतिहास 

4. भारतिय मंडळीचा इतिहास 

ख्रिस्ती असल्या नात्याने हा अभ्यास फार महत्त्वाचा आहे, कारण आपण ज्या समाजात वावरतो तेथे आमच्या विश्वासाला बरेच लोक अव्हान देतात, जसे अनेक लोक ख्रिस्ती धर्माला परकीय धर्म समझतात, तो भारतात ब्रिटिशांनी तो भारतात आणला वगैरे मते मांडतात, परन्तु जेव्हा आपण इतिहासाचे अध्ययन करतो, आपणास कळते की ख्रिस्ती सुवार्ता 2000 वर्षापूर्वीच भारतात पोहचली होती. कित्येक शतकापासुन ख्रिस्ती लोक भारतात राहत आले आहेत. 

याशिवाय जुन्या करारात यहुदी लोकांचा संबंध भारताशी ई.स.पू. 1000 वर्षाच्या आधीचा आहे हे आपणास कळते.

ख्रिस्ती इतिहासाच्या अध्ययनातुन आपल्याला देवाचा मानवी इतिहासात हस्तक्षेप व योजना याविषयी कळते, तसेच मंडळी काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यात कोणकोणत्या प्रसंगातुन गेली, तिचा विकास कसा झाला, कोणकोणते बदल झाले, पतन, उदय इत्यादि गोष्टी समझण्यास मदत होते. 

No comments:

Post a Comment