Monday, March 11, 2024

आपण खोटे शिक्षक/खोटे संदेष्टे कसे ओळखू शकतो?


प्रभू येशू आपल्याला सावधन करतना म्हणतो “‭कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’ (मत्त्तय 24:23-27; 2 पेत्र 3:3 आणि यहूदा 17-18 देखील पहा). आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खोट्या शिक्षकांविषयी सत्य जाणून घेणे आहे. खोटे शिक्षण ओळखण्यासाठी, खऱ्या शिक्षणाचा अभ्यास करणे जरुरी आहे. कोणताही विश्वासणारा जो "सत्याचे वचन बरोबर हाताळतो" (2 तीमथ्य 2: 15) आणि बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करतो, तो खोट्या शिक्षणाला ओळखू शकतो. उदाहरणार्थ, मत्त्तय 3:16-17 मधील पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्य अभ्यास केलेला व्यक्ती त्रैक्याला नाकारणाऱ्या कोणत्याही सिद्धांतावर त्वरित प्रश्न करेल. म्हणून, पहिली पायरी म्हणजे बायबलचा अभ्यास करणे आणि पवित्र शास्त्र काय म्हणते त्यातील सर्व शिकवणींचे परीक्षण करणे.

येशू म्हणाला "झाड त्याच्या फळांवरून ओळखले जाते" (मत्त्तय 12:33). ते "फळ" ओळखण्यासाठी तीन विशिष्ट चाचण्या आहेत कोणत्याही शिक्षकाचे शिक्षण खरे आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी लागू केल्या जातात:

 १) तो शिक्षक प्रभू येशूबद्दल काय म्हणतो? 
मत्त्तय 16:15-16 मध्ये येशू विचारतो, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात.”आणि या उत्तरासाठी पेत्राला "धन्य" म्हटले आहे. 2 योहान 9 मध्ये आपण वाचतो, "ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही; जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे." दुसऱ्या शब्दांत, येशू ख्रिस्त आणि त्याचे उद्धाराचे कार्य सर्वोच्च आणि महत्त्वाचे आहे; म्हणून जो कोणी येशू देवाच्या बरोबरीचा आहे हे नाकारतो, जो येशूच्या बलिदानाला कमी लेखतो किंवा जो येशूच्या मानवतेला नाकारतो त्यांच्यापासून सावध रहा. 1 योहान 2:22 "येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे.

२) हे शिक्षक योग्य सुवार्ता सांगतात का? 
वार्तेची व्याख्या पवित्र शास्त्रानुसार येशूच्या मृत्यू, गाडले जाणे आणि पुनरुत्थान याबद्दलची सुवार्ता म्हणून केली जाते (1 करिंथकर 15:1-4). “देवाची इच्छा आहे की आपण भुकेल्यांना खायला द्यावे” आणि “तुम्ही श्रीमंत व्हावे अशी देवाची इच्छा आहे” ही विधाने सुवार्तेचा संपूर्ण संदेश नाहीत. पौलाने गलती 1:7 व 9 मध्ये सावधान केले आहे. "‭‭ती दुसरी नाही; पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत.
आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की, जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो.”
3) हे शिक्षक आपल्या जीवनातून परमेश्वराचे गौरव करणारे चारित्र्य आणि. गुण दाखवतात का?
खोट्या शिक्षकांबद्दल बोलतांना, यहूदा 1: 11 मध्ये तो म्हणतो, "‭‭ त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला." दुसऱ्या शब्दांत, खोट्या शिक्षकाची ओळख त्याच्या अभिमानाने (काईनने देवाची योजना नाकारली), लोभ (पैशासाठी बलामची भविष्यवाणी करणे) आणि बंडखोरी (कोरहाने स्वत:ला मोशेवर पेक्षा स्वतःला मोठे समजले) द्वारे ओळखले जाऊ शकते. येशूने अशा लोकांपासून सावध राहण्यास सांगितले आणि संगितले आपण त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखू (मत्तय 7:15-20).

पुढील अभ्यासासाठी, मंडळीमधील खोट्या शिकवणीचा सामना करण्यासाठी विशेषतः पवित्र शास्त्र भागांचे अध्ययन करा: गलतीकरास पत्र, 2 पेत्र, 1 योहान, 2 योहान आणि यहुदा . खोटे शिक्षक/खोटा संदेष्टा ओळखणे अनेकदा कठीण असते. सैतान प्रकाशाच्या देवदूताचे रूप धारण करतो (2 करिंथ 11:14), आणि त्याचे सेवक देखील धार्मिकतेच्या सेवकांचे रूप धारण करतात (2 करिंथ 11:15). सत्याची चांगली ओळख झाल्यावरच आपण खोटे किंवा खोटे हे ओळखू शकू.

No comments:

Post a Comment