Saturday, August 7, 2021

तारण, उद्धार, मुक्ती देवाच्या कृपेनेच प्राप्त होते - कशी? खालील तक्ता पहा!

 तारण, उद्धार, मुक्ती देवाच्या कृपेनेच प्राप्त होते - कशी? खालील तक्ता पहा! 


आज या जगामध्ये मनुष्य देवाशी जवळिक निर्माण करु इच्छितो, परंतु कुठे न कुठे त्याला ठाऊक आहे की तो अपुरा पडत आहे, त्याची सत्कृत्ये, कामें, चांगुलपणा देवाच्या दृष्टिने उणे आहेत, ते देवाच्या क्रोधापासुन वाचवण्यास असमर्थ आहेत, तो विविध मार्गाचा अवलंब करतो परंतु प्रत्येक मार्ग हा त्याला देवापर्यंत पोहचवण्यास समर्थ नाही याची जाणीव त्याला प्रकर्षाने होत राहते. अपराधीपणाचे शल्य नेहमी बोचत राहते, शेवटी तो थकतो, तरीही शोधत राहतो की कोठे एक आशेचे किरण तर दिसत नाही ना! 

मनुष्यमात्राची ही तहान, धार्मिकता, तारणाची ही भुक ही त्याच्या स्वतःच्या कर्माने, भागवणे अशक्य आहे. कारण त्यासाठी मोजावी लागणारी किमत भरणे त्याच्या साठी अशक्यप्राय आहे. आणि त्यासाठीच देवाने आम्हा मानवजाती साठी पुढाकार घेतला. योहान 3:16 मध्ये म्हटले आहे, 'देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे'  येथेच देवाची कृपा प्रकट झाली, रोम 5:8 सांगते, 'परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.'  प्रभु येशुचे वधस्ततंभावरिल ते बलिदान, त्याचे वाहीलेले रक्त आम्हा मानवजातीसाठी ख्रिस्ताने मोजलेली किम्मत आहे, जी देवाच्या न्यायाचे समाधान करते. त्यामुळेच जो कोणी प्रभु येशुवर विश्वास ठेवतो तो त्याच्या पापाची क्षमा प्रभु येशू मध्ये प्राप्त करुन घेतो. म्हनुनच इफिस 2:8-10 मध्ये म्हणटलेले आहे, 'कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.

जर आज आपण पापांची क्षमा व तारण प्राप्त करु इच्छिता तर ही प्रार्थना पूर्ण अंतःकरणाने म्हणा: 

प्रभू येशु, मी कबुल करतो की मी एक अपराधी आहे, माझी कृत्ये मला तारण मिळवुन देण्यास अपुरे आहेत, परन्तु आज मला सत्य कळाले आहे की तु माझ्या पापांसाठी मेला व तिस-या दिवशी पुन्हा जिवंत झाला आहेस आणि मी तुला माझा तारणारा व प्रभू म्हणुन स्विकार करतो, माझ्या ह्रदयात प्रवेश कर आणी मला तारणाचा तो अनुभव दे.  आमेन! 


No comments:

Post a Comment