Saturday, August 14, 2021

शलमोनाने बांधलेली तटबंदीची भिंत

पुरातत्त्व संशोधकांना शलमोनाने बांधलेली तटबंदीची भिंत सापडली आहे जी ईस्वी पूर्व 1000-901 दरम्यान बांधली गेल्याचा अंदाज आहे.

ही भिंत 70 मीटर लांब, 19 मीटर उंच आहे. ही भिंत ओफेल नावाच्या ठिकाणी आहे, टेम्पल माउंटच्या दक्षिणेकडील भिंत आणि दाविद नगरीच्या भिंतीच्या दरम्यान असुन त्याविषयी आम्हाला 1 राजे 9:15 मध्ये शलमोनाने त्याच्या बांधकामाचे वर्णन सापडते.

या भिंतीचे वर्णन 1 राजे 3: 1 मध्ये देखील आहे. वाचा

शलमोनाने मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याशी सोयरसंबंध केला; त्याने त्याच्या मुलीशी लग्न करून तिला दावीदपुरास आणले आणि आपले मंदिर, परमेश्वराचे मंदिर व यरुशलेमेच्या सभोवतालची तटबंदी बांधून होईपर्यंत त्याने तिला तेथेच ठेवले.

या ठिकाणी मातीच्या मोठ मोठाले भांडी सापडलेल्या आहेत. ती भांडी पुरातत्त्व विषयक तपासात इ.स.पू 1000 चे असल्याचे पुरावे सापडले आहेत. ते पाणी साठवण्यासाठी वापरले जात होते. येथे सापडलेली भांडी ही आतापर्यंत सापडलेल्या भांडींपैकी सर्वात मोठी आहे. जी 3.7 फूट उंच होती. ज्यावर 'राजासाठी' असे लिहिले होते. या वरून कळते की ही भांडी सरकारी कामासाठी समर्पित होती. 

No comments:

Post a Comment