Thursday, September 23, 2021

मिसर देशात परकीय लोक प्रवेश करित असलेली गुहाचित्र

मिसर देशात परकीय लोक प्रवेश करित असलेली गुहाचित्र


प्रस्तुत चित्र ही बेनि-हसन याच्या कबरेतील भिंतीवरिल आहेत, या चित्रांमध्ये परकिय लोक मिसर देशात पवेश करित आहेत हे आपण पाहु शकतो. पुरातत्व विदवानांच्या मतांनुसार ही चित्रे जवळजवळ 4000 वर्षापूर्वीची आहेत. यावरुन कळते की ही चित्रे अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या काळातील आहेत, कनान हाँ बहुतेक शुष्क प्रदेश असल्याकारणाने कनानी मेंढपाळ नाईल नदीच्या खो-यात आपली कळपे घेऊन येत, अशी अनेक गुहाचित्रे सापडलेली आहेत, त्याचबरोबर मिसरच्या प्राचिन इतिहासात याविषयी वर्णने आढळतात.

उत्पत्ति व निर्गम पुस्तकात आपण याकोब व त्याच्या वंशजाना मिसर देशात प्रवेश करताना व वास्तव्य करतानाचे वर्णन पाहतो, हे गुहाचित्रे आपणाला याघटनेचे ठोस पुरावे देतात.


No comments:

Post a Comment