ख्रिस्ती
सिध्दांत
प्रकरण 1: ख्रिस्ती सिध्दांत – परिचय
ख्रिस्ती सिध्दांत
म्हणजे काय?
यांस ईश्वर विज्ञान देखील म्हटले जाते; इंग्रजी भाषेत Theology या शब्दाचा तो साधारणपणे अनुवाद आहे.
हा शब्द मुळ ग्रिक भाषेतुन आलेला जोड-शब्द असुन थियोस म्हणजे देव किंवा ईश्वर, आणि
लोगस म्हणजे लेख, ज्ञान, उपदेश इत्यादि. साधारणतः ईश्वर विज्ञान (ख्रिस्ती
सिध्दांत) मध्ये आपण देवाविषयी अभ्यास करतो, ज्या देवाचा संबंध
या संपूर्ण विश्वाशी आहे.
सामान्यतः ख्रिस्ती सिध्दांताचा अभ्यास पुढील प्रमाणे केला जाऊ शकतो:
- सुसंघटित/ पायाभुत सिध्दांत:
पवित्र शास्त्रामध्ये असलेले सत्य ज्यांवर आपण विश्वास ठेवतो, ती अशी माहीती असावी जी पवित्रशास्त्र अधारीत असते आणि निश्चित असते. जसे एकच
खरा देव, ख्रिस्त येशु, पवित्रात्मा,
त्रैक्य, पाप, तारण,
मंडळी, देवदुत, शेवटचा काळ,
इत्यांदी. हे सिध्दांत आपणास एकाच अध्यायातुन मिळत नसतात तर ते संपूर्ण पवित्रशास्त्रात विखुरलेले
असतात. एखादा सिध्दांत आपण पवित्रशास्त्रातुन समजुन घेऊ शकतो.
- पवित्रशास्त्राच्या विभाजनानुसार सिध्दांत: यात आपण पवित्रशास्त्राच्या दोन भागात जसे जुन्या करारात व नव्या करारात कोणते सिध्दांत आहेत ते शिकतो.
- ऐतिहासिक दृष्टिकोनातुन ख्रिस्ती सिध्दांताचा
अभ्यास: मंडळीच्या काळखंडात, वेगवेगळ्या
काळात मंडळीने काय विश्वास ठेवला, याचे अध्ययन ऐतिहासिकरित्या
केले जाते. उदा. प्रथम शतकातील मंडळीचे सिध्दांत, मध्ययुगीन काळातील
मंडळीचे विश्वासमत इ.
- व्यावहारिक ख्रिस्ती सिध्दांत: ख्रिस्ती सिध्दांताचा व्यावहारिक जीवनात होणारा उपयोग याचा अभ्यास होतो.
ख्रिस्ती सिध्दांताच्या
अध्ययनाची गरज:
ख्रिस्ती सिध्दांत हा ख्रिस्ती विश्वासाचा महत्त्वाचा
भाग आहे.
या अंतर्गत यणारे विषय ख्रिस्ती विश्वासाचे मुळ पाया असतात. त्याआधारे
ख्रिस्ती जीवनाचा विकास होत असतो. त्यामुळे त्यांची अचूक व योग्य माहीती असणे गरजेचे
असते. जर पुढारी, उपदेशक व विश्वासणारे यांनी या विषयाला गंभीरतेने
घेतले नाही तर एक अज्ञानाची पोकळी निर्माण होईल. होशेय 4:6 मध्ये देखिल काही याचप्रकारे
लिहले गेलेले आहे, ‘ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश
झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू
आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.’
ख्रिस्ती सिध्दांताच्या अध्ययनाची आवश्यकतेचे काही
कारण पुढील प्रमाणे असु शकतात.
- परिपक्व ख्रिस्ती होण्याकरितां: देवाचे वचन ख्रिस्ती व्यक्तीच्या वाढीकरिता आहे. जेव्हा त्याचे योग्य प्रकारे, योग्य मार्गदर्शनाखाली अध्ययन होते, एक ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्तामध्ये वाढत जातो. यासाठीच देवाने मंडळीमध्ये पुढारीपणाचे दान दिलेले आहे. इफिस 4:11-14
आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले;
ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे.
देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहचू तोपर्यंत दिले;
ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.
- खोट्या शिक्षणापासुन वाचण्याकरितां: या जगामध्ये पवित्रशास्त्रातील वचनाचा घेऊन, त्याचा चुकीचा अर्थ लावुन किंवा समजुन, स्वतःच्या फायद्यासाठी, किंवा शैतानच्या भुलथापाना बळी पडुन, अनेक पंथ, शिक्षक उपदेशक या जगात आहेत जे खोटे शिक्षण पसरवत आहेत आणि कित्येकांना अनुयायी बनवत आहेत. अशा खोट्या शिक्षणाला तेच लोक बळी पडतात ज्यांचा शिक्षण रुपी पाया मजबुत नसतो. ख्रिस्ती सिध्दांताचे अध्ययन हे आपल्याला खोट्या व ख-या शिक्षणाला ओळखण्यास मदत करते.
- सेवेत वाढण्याकरितां आणि शिष्य निर्माण करण्याकरितां: देवाची सेवा करण्याकरिता अर्थात पाळकीय सेवा किंवा पुढारीपणाची कोणतीही सेवा करण्याकरितां आपला खिस्ती शिक्षणात पाया मजबुत असणे गरजेचे आहे. पौलाने तीमथ्याला पत्रातुन या विषयी विशेष भर देत शिक्षण व पवित्रशास्त्राचे महत्त्व पटवुन दिले. (वाचा 1 तीम 1:19, 4:13, 6:20 2 तीम 3:13-17)
ख्रिस्ती
सिध्दांताचे मुलभुत विषय:
- पवित्र शास्त्र
- देव
- खिस्त येशु
- पवित्र आत्मा
- मनुष्य
- पाप
- तारण
- मंडळी
- देवदुत
- शेवटच्या गोष्टी व प्रभु येशूचे दुसरे आगमन
No comments:
Post a Comment