Tuesday, January 28, 2025

मंडळी म्हणजे काय?

मंडळी म्हणजे काय?
आज अनेक लोक चर्च म्हणजेच मंडळीला एक इमारत समजतात. परंतु, बायबलानुसार ही समज चुकीची आहे. ‘‘चर्च’’ हा शब्द ग्रीक शब्द एक्लेसिया वरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘‘एकत्र बोलावलेले लोक’’ असा होतो. त्यामुळे ‘‘चर्च’’ या शब्दाचा संबंध इमारतीशी नसून, लोकांशी आहे. रोमकरांस 16:5 मध्ये लिहिले आहे, ‘‘तसेच त्यांच्या घरातील मंडळीला माझा नमस्कार सांगा.’’ येथे पवित्र शास्त्रात पौलाने इमारतीचा नव्हे, तर घरात एकत्र येणाऱ्या विश्वासूंचा उल्लेख केला आहे.

मंडळी ही ख्रिस्ताचे शरीर आहे, आणि ख्रिस्त तिचा मस्तक आहे. इफिसकरांस 1:22-23 मध्ये लिहिले आहे, ‘‘देवाने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याला सर्व गोष्टींचा अधिपती करून मंडळीला दिले. मंडळी ही त्याचे शरीर आहे आणि त्याच्या परिपूर्णतेने परिपूर्ण आहे, जो सर्व गोष्टींमध्ये सर्वकाही परिपूर्ण करतो.’’ पेन्तकोस्ट दिनापासून (प्रेषितांचीं कृत्यें अध्याय 2) ख्रिस्ताचे शरीर किंवा देह म्हणजेच मंडळी सर्व विश्वासूंनी मिळून ख्रिस्ताच्या पुनरागमनापर्यंत स्थिर राहील. ख्रिस्ताच्या देहाला दोन पैलू आहेत:

1. सार्वभौमिक मंडळी: सार्वभौमिक मंडळीत ते सर्वजण आहेत ज्यांचा येशू ख्रिस्ताशी वैयक्तिक संबंध आहे. ‘‘कारण आपण यहूदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे.1 आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. (1 करिंथकरांस 12:13) वचन सांगते की जो कोणी विश्वास ठेवतो, तो ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे आणि ख्रिस्ताच्या आत्म्याचे प्रमाण त्याला मिळाले आहे. सार्वभौमिक मंडळी म्हणजे ती मंडळी ज्या लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून उद्धार प्राप्त केला आहे.

2. स्थानिक मंडळी: गलतीकरांस 1:1-2 मध्ये लिहिले आहे, ‘‘गलतीयातील मंडळ्यांना : .... ह्यांच्या द्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्या-बरोबरच्या सर्व बंधूंकडू’’ येथे आपण पाहतो की गलातिया प्रदेशात अनेक मंडळ्या होत्या – ज्यांना आपण स्थानिक मंडळी म्हणतो. बॅप्टिस्ट चर्च, लुथरन चर्च, कॅथोलिक चर्च इत्यादी, या सार्वभौमिक मंडळी नाहीत – तर स्थानिक मंडळी म्हणजे विश्वासूंचा एक स्थानिक गट आहे. सार्वभौमिक मंडळीत ते लोक आहेत जे ख्रिस्ताशी संबंधित आहेत आणि उद्धारासाठी त्याच्यावर विश्वास ठेवतात. या सार्वभौमिक मंडळीचे सदस्य संगतीसाठी आणि आत्मिक प्रगतीसाठी स्थानिक मंडळीत सहभागी होणे आवश्यक आहे.

सारांश: मंडळी म्हणजे एखादी इमारत किंवा एखादा विशिष्ट पंथ नाही. बायबलानुसार, मंडळी म्हणजे ख्रिस्ताचे शरीर आहे – ते सर्वजण ज्यांनी उद्धारासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे. स्थानिक मंडळी ही सार्वभौमिक मंडळीच्या सदस्यांची संगती आहे. स्थानिक मंडळी हा तो ठिकाण आहे जिथे सार्वभौमिक मंडळीचे सदस्य एकमेकांना प्रोत्साहन देतात, शिकवतात, आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या ज्ञान व कृपेमध्ये प्रगती करण्यासाठी परस्परांना सहाय्य करतात.

No comments:

Post a Comment