Tuesday, March 26, 2024

प्रभू येशू ख्रिस्त अन्य भाषेत बोलत होता का?

प्रभू येशू ख्रिस्त अन्य भाषेत बोलत होता का?
सर्वप्रथम पवित्र शास्त्र असा कोणताच पुरावा देत नाही. जेणेकरून असे म्हणता येईल की प्रभू येशू अन्य भाषेत बोलत होता.

हा दावा आहे तो पॅंटीकॉस्टल पंथा करवी केला जातो. असा दावा ते प्रभू येशू ख्रिस्ताने नवा करारामध्ये अरेमिक भाषेत जे शब्द उच्चारले त्यावरून करतात. जसे एलोई एलोई लमा सबकथनी. (मार्क 15.3) त्याशिवाय का हीवेळेस प्रवेश होणे चमत्कार करताना तोंडातल्या तोंडात काही शब्द पुटपुटले ‭‭(मार्क 7:34 आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, “इप्फाथा,” म्हणजे “मोकळा हो.”) यावरून देवाच्या वचनाचा विपर्यास करणारे येशू अन्य भाषेत बोलला असा दावा करतात. जो पवित्र शास्त्राच्या संदर्भात धरून नाही. येशू ने त्याच्या सेवकांमध्ये कधीही अन्य भाषा बोलली नाही . याच्या स्पष्टीकरणार्थ पुढील काही मुद्द्यांचा विचार करू...

1. प्रभू येशू बाप्तिस्मा घेत असताना पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला, त्या घटनेच्या वेळेस प्रभू येशू ने कोणतीही अन्य भाषा उच्चारली नाही आणि असा कोणताही उल्लेख तेथे नाही. (मत्तय 3.13 ते 17)
2. प्रभू येशू क्रूसावर जे अरेमिक शब्द बोलला ते तेथे उपस्थित असलेल्या यहुदी लोकांना कळले कारण अरेमिक भाषा ही तेव्हाच्या यहूद्यांची एक बोलीभाषा होती. (मार्क 15.3)
3. प्रभू येशू ख्रिस्ताची जी सेवा होती ती प्रामुख्याने यहुदी लोकांमध्ये होती आणि तेव्हाची यहूद्यायची जी बोलीभाषा होती आणि ग्रीक ती प्रभू येशू ख्रिस्ताला चांगल्या प्रकारे येत होती आणि त्यामुळे तेथे अन्य भाषा बोलण्याचा कोणताही संबंध येत नाही. 
4. अन्य भाषा हे पवित्र आत्म्याचे एक वरदान आहे, ते मंडळीच्या उन्नतीसाठी आणि प्रसारासाठी दिले गेलेले वरदान आहे (1 करिं.12 अध्य्याय)आणि त्यामुळेच जेव्हा पेंटेकोस्टच्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यांवर उतरला तेव्हा दे आत्म्याने भरून अन्य भाषेत देवाची गौरव करू लागले. (प्रेषित 2 अध्याय) यावरून आपल्याला कळते की पवित्र आत्म्याने भरून अन्य भाषेत बोलणे हे वरदान पेंटेकोस्टच्या दिवसापासून शिष्यांमध्ये क्रियाशील झाले. त्यामुळे मंडळीच्या स्थापनेपूर्वी अन्य भाषेत बोलणे हे वरदान क्रियेत नव्हते.

यावरून हा दावा की प्रभू येशू भाषेत बोलत होता हा खोटा ठरतो.

No comments:

Post a Comment