Friday, March 1, 2024

बायबलमध्ये आणखी पुस्तके जोडली जाणे शक्य आहे का?

बायबलमध्ये आणखी पुस्तके जोडली जाणे शक्य आहे का?

 देव त्याच्या वचनात भर घालण्यासाठी आणखी प्रकटीकरण देईल यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण आज आपल्याला दिसत नाही. बायबलची सुरुवात मनुष्याच्या निर्मितीपासून होते, म्हणजेच उत्पत्तीच्या पुस्तकाने होते आणि शेवट मानवजातीच्या समाप्तीसह होते, ज्याला आपण प्रकटीकरणाचे पुस्तक म्हणून ओळखतो. या दोघांमध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट ख्रिस्ती लोकांच्या विकासासाठी, आपले दैनंदिन जीवन देवाच्या सत्याने सामर्थ्यवान होण्यासाठी दिले आहे. आपल्याला  2 तीमथ्य 3:16-17 वरून कळते की, "प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.."


पवित्र शास्त्रामध्ये आणखी काही पुस्तके जोडली गेल्यास, किंवा तसे केल्याने असे म्हणण्यासारखे होईल की आज आपल्याकडे असलेले बायबल पूर्ण नाही – जे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे ते ते आपल्याला सांगत नाही. हे वचन हरी केवळ प्रकटीकरणाच्या पुस्तकाला अप्रत्यक्षपणे लागू होत असले तरी, प्रकटीकरण 22:18-20 आपल्याला देवाच्या वचनात आणखी काही जोडण्याबद्दल एक महत्त्वाचे सत्य शिकवते: “18 ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणार्‍या प्रत्येकाला मी निश्‍चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील; 19 ‘आणि’ जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही ‘काढून टाकील’ त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील."

बायबलच्या ६६ पुस्तकांमध्ये जे काही उपलब्ध आहे ते आमच्याकडे आहे. जीवनाची अशी कोणतीही परिस्थिती उरलेली नाही जी शास्त्राद्वारे संबोधित केलेली नाही. उत्पत्तीमध्ये जे सुरू झाले त्याचा शेवट प्रकटीकरणात होतो. बायबल पूर्णपणे पूर्ण आणि पुरेसे आहे. देव बायबलमध्ये काही जोडू शकतो का? तो करू शकतो यात शंका नाही. तथापि, बायबल अधारित किंवा सिद्धांताच्या दृष्टिकोणातुन , तो हे करेल यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही, किंवा त्याला तसे करण्यासाठी कोणतीही गरज आहे.

No comments:

Post a Comment