Friday, February 9, 2024

जर माझे तारण झाले आणि माझ्या सर्व पापांची क्षमा झाली आहे, तर मग मी पाप करतच का राहू नये? पाप सोडणे का गरजेचे आहे?

जर माझे तारण झाले आणि माझ्या सर्व पापांची क्षमा झाली आहे, तर मग मी पाप करतच का राहू नये? पाप सोडणे का गरजेचे आहे? 
 प्रेषित पौलाने रोमन्स 6:1-2 मध्ये अगदी समान प्रश्नाचे उत्तर दिले, "‭‭रोमकरांस पत्र‬ ‭6:1‭-‬2‬ ‭"तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? [कधीच नाही! जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार?" एखादी व्यक्ती तारणासाठी "येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकते" आणि नंतर तो/ती पूर्वी जसे जगत असे तसेच जगू शकते, ही संकल्पना बायबलसाठी अजिबात नाही." ख्रिस्तामध्ये विश्वासणारे नवीन निर्मिती आहेत (2 करिंथ 5:17). पवित्र आत्मा आपल्याला देहाची कृत्ये करण्यापासून थांबवितो (गलती 5:19-21) आणि आपल्यात आत्म्याचे फळ उत्पन्न करतो (गलती 5:22-23). ख्रिस्ती जीवन हे बदललेले जीवन आहे कारण ख्रिस्त बदललेले लोक आहेत.

ख्रिस्ती धर्माला इतर धर्मांपेक्षा वेगळे काय करते? तर ते म्हणजे ख्रिस्ती धर्म येशू ख्रिस्ताद्वारे देवाने आपल्यासाठी जे काही केले आहे त्यावर आधारित आहे- देव सिद्ध करणारा आहे. इतर प्रत्येक जागतिक धर्म देवाची कृपा आणि क्षमा मिळविण्यासाठी काय केले पाहिजे यावर आधारित आहे - त्यात मानवी प्रयत्न आणि कर्माला प्राधान्य आहे. इतर प्रत्येक धर्म शिकवतो की देवाचे प्रेम आणि दया मिळविण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही गोष्टी करणे थांबवले पाहिजे. ख्रिस्ती धर्म, ख्रिस्तावरील विश्वास, हे शिकवते की ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केले आहे त्यामुळे आपण काही गोष्टी करतो आणि काही गोष्टी करणे थांबवतो.

ख्रिस्ताच्या द्वारे आपले जीवन बदलते. तर मग पापाच्या शिक्षेपासून मुक्त होऊन, कोणीही परत त्याच जीवनात कसे जाऊ शकते? ज्याने त्याला प्रथम नरकाच्या मार्गावरून बाहेर आणले होते तो परत त्याच मार्गावर कसे जाऊ शकतो? पापाच्या विटाळातून शुद्ध होऊन, त्याच दुष्टतेच्या कुंडात परत जाण्याची इच्छा कोणी कशी करू शकतो? येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केले हे जाणून कोणीही, तो महत्त्वाचा नसल्यासारखे कसे जगू शकेल? ख्रिस्ताने आपल्या पापांसाठी किती दु:ख भोगले हे समजून कोणीही ते दुःख निरर्थक असल्यासारखे पाप करीत कसे राहू शकेल?

रोम 6:11-15 घोषित करते, "‭‭[11] तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारे स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना. [12] ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये; [13] आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. [14] तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. [15] तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही!"

 खऱ्या अर्थाने परिवर्तित लोकांसाठी, पापी जीवन जगणे हा पर्याय नाही. कारण आपल्याला परिवर्तनामुळे पूर्णपणे नवीन स्वरूप प्राप्त झालेले आहे.  

आपल्याला यापुढे पापात जगण्याची इच्छा होते का? होय, कधी कधी आपण अजूनही पापमय चुका करतो, परंतु आपण पूर्वी केल्याप्रमाणे त्यामध्ये गुरफटण्याऐवजी, आता आपण त्याचा तिरस्कार करतो, पश्चताप करतो आणि त्यापासून मुक्त होण्याची इच्छा करतो.  

पापी जीवन जगून आपल्या वतीने ख्रिस्ताच्या बलिदानाचा “फायदा” घेण्याची कल्पना अकल्पनीय आहे. ज्या ख्रिस्ती लोकांना ख्रिस्तासाठी जगण्याची इच्छा नाही, परंतु त्याऐवजी ते स्वतः अविश्वासू लोकां सारखे जीवन जगतात, त्यांनी खऱ्या अर्थाने ख्रिस्ताला तारणहार म्हणून स्वीकारले आहे की नाही हे तपासावे. “‭‭ तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. (2 करिंथ 13:5).

No comments:

Post a Comment