Friday, February 9, 2024

तारण म्हणजे काय? तारणाचा ख्रिस्ती सिद्धांत काय आहे?


तारण म्हणजे काय? तारणाचा ख्रिस्ती सिद्धांत काय आहे?
तारण म्हणजे दुःख किंवा धोक्यापासून सुटका. तारण करणे म्हणजे संरक्षण किंवा सुटका प्रदान करणे. या शब्दात विजय, आशिर्वाद किंवा संरक्षणाची कल्पना आहे. काहीवेळा बायबल तारण शब्द तात्पुरत्या, शारीरिक सुटकेसाठी वापरते, जसे पौलाची तुरुंगातून सुटका (फिलिप्पै १:१९).

 सामान्यतः, "तारण" हा शब्द शाश्वत, आध्यात्मिक सुटकेला सूचित करतो. जेव्हा पौलने फिलिप्पि तुरुंग अधिकाऱ्याला सांगितले की त्याचे तारण आवश्यक आहे, तेव्हा तो तुरुंगअधिकाऱ्याला त्याच्या सर्वकालिक गंतव्यस्थानाकडे निर्देशिन करत होता (प्रेषितांची कृत्ये 16:30-31). येशूने तारण मिळणे हे देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासारखे शिकवले (मत्तय 19:24-25).

आपण कशापासून वाचतो? तारणाच्या ख्रिस्ती सिद्धांतामध्ये, आपण "क्रोधा" पासून वाचतो, म्हणजेच, पापासाठी देवाच्या न्यायदंडापासून (रोम 5:9; 1 थेस्सलनीकर 5:9). आपल्या पापांनी आपल्याला देवापासून वेगळे केले आहे आणि पापाचा परिणाम म्हणजे मृत्यू (रोम 6:23). बायबलसंबंधी तारण म्हणजे पापाच्या परिणामांपासून सुटका आणि म्हणून त्यात पाप काढून टाकणे समाविष्ट आहे.

पापापासून तारण कोण करतो? केवळ देवच पाप दूर करू शकतो आणि पापाच्या दंडापासून मुक्त करू शकतो (२ तीमथ्य १:९; तीतस ३:५).

देव कसा वाचवतो? तारणाच्या ख्रिस्ती सिद्धांतामध्ये, देवाने आपल्याला ख्रिस्ताद्वारे वाचवले आहे (योहान 3:17). विशेषतः, वधस्तंभावरील ख्रिस्ताचा मृत्यू आणि परिणामी पुनरुत्थान हे आपल्यासाठी तारण आणते (रोम 5:10; इफिस 1:7). पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट आहे की तारण ही देवाची देणगी आहे, कृपेने, आमच्या कोणत्याही योग्यतेशिवाय देव आम्हाला तारण देतो (इफिस 2:5, 8) आणि केवळ येशू ख्रिस्तावरील विश्वासाने उपलब्ध आहे (प्रेषितांची कृत्ये 4:12).

आपल्याला तारण कसे मिळेल? आपण विश्वासाने तारलेलो आहोत. प्रथम, आपण सुवार्ता ऐकली पाहिजे - येशूच्या मृत्यूची आणि पुनरुत्थानाची सुवार्ता (इफिस 1:13). पुढे, आपण विश्वास ठेवला पाहिजे - प्रभु येशूवर पूर्ण विश्वास ठेवा (रोमन्स 1:16). यात पश्चात्तापाचा समावेश आहे, म्हणजेच पाप आणि ख्रिस्ताबद्दल मन वळवणे (प्रेषितांची कृत्ये ३:१९), आणि प्रभु येशू ख्रिस्ताचे नावाचा धावा करणे अर्थात त्याचा नावावर भरोसा ठेवणे(रोम १०:९-१०, १३).

 तारणाच्या ख्रिस्ती सिद्धांताची व्याख्या अशी केली जाईल, "देवाच्या कृपेने, पापाच्या सर्वकालिक शिक्षेपासून मुक्ती, जो देवाच्या पश्चात्तापाच्या अटी स्वीकारतो आणि प्रभु येशूवर विश्वास ठेवतो त्याला तारण हे प्रदान केले जाते. " तारण केवळ येशूमध्ये उपलब्ध आहे (योहान 14:6; प्रे. कृत्ये 4:12) आणि मनुष्य संरक्षण, आश्वासन आणि सुरक्षिततेसाठी केवळ देवावर अवलंबून आहे.

साभार: Got Questions 

No comments:

Post a Comment