Monday, September 11, 2023

फारो हाफ्रा बद्दल शिलालेख (हा शिलालेख एका शेतक-याच्या शेतात मिळालेला आहे - जुन 2021)

फारो हाफ्रा बद्दल शिलालेख (एका शेतक-याच्या शेतात मिळाला - जुन 2021)


इजिप्शियन फारो वाहिब्रे (हिब्रूमध्ये हफ्रा, ग्रीकमध्ये एप्रीस या नावाने ओळखले जाते) असे नाव असलेला शिलालेख अलीकडेच एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात मशागत करत असताना सापडला; त्यांने तो ताबडतोब इजिप्शियन पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालयाकडे पाठवला.


हा शिलालेख वाळूच्या दगडात कोरलेला आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला गोलाकार लुनेटवर पंख असलेली सन-डिस्क आणि वाहिब्रेचा कार्टूच आहे. वाहिब्रे (हफ्रा/एप्रीस) हा २६ व्या राजघराण्याचा फारो होता ज्याने ५८९-५७० इ.स.पू. पर्यंत राज्य केले. इजिप्शियन पुरातन वस्तूंच्या विद्वानांचा असा विश्वास आहे की हा शिलालेख त्याच्या पूर्वेकडील लष्करी मोहिमेदरम्यान उभारण्यात आला होता. पवित्र शास्त्रात याची नोंद आहे की राजा सिद्कीयाने जेव्हा बाबेलचा राजा नेबुचदनेस्सर याच्या विरुद्ध बंड केले, (2 Kgs 24:15-17, ), तेव्हा त्याने मदतीसाठी इजिप्तकडे बोलावणे पाठविले. हफ्राचे सैन्य सिदकीयाच्या मदतीसाठी निघाले आणि नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमवर हल्ला करण्यापासून माघार घेतली (यिर्म. 37:5-8).

नुकत्याच सापडलेल्या हा शिलालेख हफ्राच्या या मोहिमेशी संबंधित आहे का हे पाहणे देखील मनोरंजक ठरेल. यिर्मया 44:30 मध्ये फारोचा हफ्रा नावाने उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाचा राजा सिद्कीया ह्याचा वैरी जो बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर तो त्याचा घात करण्यास पाहत होता, त्याच्या हाती मी त्याला दिले त्याप्रमाणे मिसरी राजा, फारो हफ्रा ह्याला मी त्याच्या वैर्‍यांच्या व त्याचा घात करू पाहणार्‍यांच्या हाती देईन.”

हे लक्षात घ्यावे की, हा शिलालेख इस्माईलिया, इजिप्त येथे सापडला आहे येथुन तहपन्हेस हे प्राचिन शहर 29 मैलावर आहे, जेथे यिर्मयाला बंदी बनवुन नेले गेले होते. ( यिर्म. 43:6-7) आणि येथूनच त्याने फारो हफ्राच्या विरुद्धाधात भविष्यवाणी केली होती  (यिर्म. 44:1).

No comments:

Post a Comment