एपिक ऑफ गिलगमेश टैबलेट (जलप्रलया विषयी समांतर नोंद)
एपिक ऑफ गिलगामेशचा हा 11 वा टॅब्लेट आहे. या टॅब्लेटवर क्यूनिफॉर्म मजकूर आहे. (कोनफॉर्म - मातीच्या पट्ट्या ज्यावर प्राचीन काळात माहिती लिहिली गेली होती.),हे पवित्र शास्त्रातील उत्पत्तीच्या
पुस्तकातील महापूर (जलप्रलय) आणि नोहा आणि त्याच्या जहाजाशी संबंधित आहे. जॉर्ज
स्मिथ,
ब्रिटिश संग्रहालयातील सहाय्यकाने जेव्हा पहिल्यांदा हा शिलालेख
वाचला, तेव्हा त्याने उडी मारली आणि मोठ्या उत्साहात खोलीत
गेला आणि आनंदाने इतका वेडा झाला होता की त्याने आपले कपडे काढायला सुरुवात केली,
तेथे उपस्थित लोकांना त्याचे आश्चर्य वाटले.
देवाने मानवजातीचा नाश करण्यासाठी
महापूर (जलप्रलय) कसा पाठवला याचे वर्णन या टॅबलैट मध्ये आहे. उत-नॅपश्तिला
गुप्तपणे देवाचा संदेश मिळाला आणि मानव आणि प्राण्यांचे अस्तित्व सुनिश्चित
करण्यासाठी त्याला बोट बांधण्याची सुचना करण्यात आली. ती निसिर उत्तर अश्शूर
पर्वतावर बोट सुरक्षितपणे उतरण्यापूर्वी प्रथम पक्ष्यांना आकाशात सोडण्यात आले असे
वर्णन या पाट्यांमध्ये आढळते.
इराकमधील मेसोपोटेमियामधील कोयुनजिक (निनवे) येथील अश्शूर राजा अशुरबनीपाल II च्या ग्रंथालयातून (इ.स.पूर्व 7 वे शतक) (निनेवे शहरात सापडलेली ही एक मोठी भूमिगत ग्रंथालय आहे ज्यात सुमारे 22,000 मातीच्या पाट्या (टॅबलैट) आहेत. जॉर्ज स्मिथने 1872 मध्ये हा लेख शोधून काढला.)
संदर्भ:
1. ब्रिटिश
संग्रहालय, लंडन
2. बायबल
अंड आर्कियोलॉजी – जॉनसन पौल
No comments:
Post a Comment