Monday, July 12, 2021

शमशोन व दागोन देवतेचे मंदिर

शमशोन व दागोन देवतेचे मंदिर

संबंध: शास्तेचे पुस्तक (अ. 16:23-30)

घटना

आपण सर्व शमशोन याच्या विषय जाणतच असाल, तो देवाचा नाजीर होता. देवाने पलिष्टी लोकांपासुन सोडवण्यासाठी त्याचा उपयोग करुन घेतला. शास्ते 16:23-30 मध्ये आपण शमशोनच्या जीवनातील अंतिम घटना पाहतो, जेव्हा धोक्याने शमशोनचे केस कापले जातात, त्याची शक्ति गेल्यामुळे पलिष्टी लोकांनी त्याचे डोळे फोडुन स्वतःच्या देवाच्या मंदिरात घेऊन जातात. त्यांच्या देवाने त्याला त्यांच्या हाती दिल्याबद्दल ते स्तवन करु लागतात. अशाप्रकारे त्यावेळी शमशोन त्यांच्या करमनुकीचा विषय झाला होता.

शमशोन याने त्यावेळी जिवंत देवाला पुन्हा एकदा सहाय्य मागितले, व ते मंदिर ज्या खांबावर आधारालेले होते त्याला जोरदार धक्का देऊन मंदिराचे छत पाडुन टाकले, याप्रकारे त्याने त्या मंदिरात उपस्थित जवळ जवळ तीन हजार लोकांचा संहार केला.

शोध

बार-लान युनिवर्सिटीतील पुरातत्ववेत्त्याना पलेस्टाईन मधील गाथ ज्याला गोलियाथचे नगर म्हणुन ही ओळखले जाते,

तेथे उत्त्खननात महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. तेथे त्यांना दागोन देवताचे मंदिर देखील सापडले आहे.

 8 जुन 2010 मध्ये बार-लान युनिवर्सिटी इस्राएल व पुरातत्व विभागाचे प्रोफेसर अरेन माईर यांनी घोषणा केली की, ‘त्यांना व त्यांच्या टिमला तेथे एक उपासनेचे मंदिर व उपासनेचे बरेचसे साहित्य मिळाले आहे, त्यांची तारिख ई.स.पू. 10 आढळुन आलेली आहे. या मंदिराची रचना पवित्र शास्त्रात वर्णन केलेल्या प्रमाणेच असुन, ते मध्यभागा पासुन दोन खांबावर आधारलेले होते. (शास्ते 16:29) ती जागा किर्यात गतच्या जवळ व यरुशलेम व अश्कोलनच्या मध्यभागी आहे. प्रोफेसर मोईर ने त्या भागात 13 वर्षे उत्खननाचे निर्देशन केलेले आहे.1

संदर्भ

1. https://www.ynetnews.com/articles/1,7340,L-3927273,00.html (08.06.2010))

2.  बाइबल अंड आर्कियोलॉजी (जॉनसन पॉल)

No comments:

Post a Comment