Tuesday, July 6, 2021

अब्राहमाचे सैन्य

 अब्राहमाचे सैन्य

14 आपल्या भाऊबंदांना पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशे अठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.

15 त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

16 त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली; त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले.

उत्प 14:14-16

ई. स. पू 2000 च्या आसपास एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक या राजा व सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा यांच्यामध्ये मोठे युध्द झाले. यात सदोम आणि गमोराच्या राजांचा पराभव झाला. आणि अब्राहमचा भाचा लोट व त्याचे कुटुंब यांना बंदी बनवण्यात आले. सोबत त्याचे सर्व धन देखिल लुटण्यात आले.

जेव्हा अब्राहमापर्यंत ही खबर गेली त्याने लागलेच जवाबी कारवाही करत, स्वतःचे खाजगी सैन्य जे प्रशिक्षित व 318 जणाची एक तुकडी होती घेतली आणि मोठ्या शिताफिने वेगवेग्ळ्या आघाड्या बनवत त्या चारही राजांच्या विरोधात योजनापूर्वक युध्द केले व लोटासहित सर्व संपत्ती परत मिळवुन आणली.

जेव्हा ऊर या नगराचे उत्खनन झाले तेव्हा तेथे निर्वासन लेख मिळाले (Execration Texts) जे मातीच्या पाट्याच्या स्वरुपात असुन, त्यावरिल लेखातुन अब्राहमाच्या वेळेच्या संस्कृतिचे, राहणीमानाचे, दैनिक जिवन, नियम इत्यदिचे विवरण सापडते. त्या पाट्ट्यावरिल लेखातुन ही गोष्ट सिध्द झाली आहे की, अब्राहमाच्या समकाळात लोकांना स्वतःचे खाजगी सैन्य ठेवण्याची परवानगी होती. त्या सेनेत 40 ते 600 पर्यंत सैनिक समाविष्ट असत. अब्राहमा जवळ एक चांगले प्रशिक्षित सैन्य होते हाँ शोध उत्पतीच्या वृतांतला दुजोरा देणारा आहे

प्राप्त मातिच्या या पाट्यांमध्ये त्याकाळातिल धंवान व्यापारी आणि प्रसस्थ लोकांचे सैन्य व त्यांची नावे लिहलेली मिळालेली आहेत.

#उत्पत्ती #अब्राहम #जुन्या_कराराचे_पुरातत्व_सबुत 

संदर्भ: Evidence for Truth Vol II (Dr E. K. Victor Pearce) 

No comments:

Post a Comment