ख्रिस्ती शिक्षण हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे, जर तो मजबुत नसेल ख्रिस्ती जीवन हे डगमगणारे, अपरिपक्व असेल, ते सहज खोट्या शिक्षणाच्या आहारी जाऊन स्वतःच्या नाशाला कारण ठरेल. म्हणून आपण नव्याकरारात ख्रिस्ती शिक्षणाचे महत्त्व वारंवार पाहतो.
- प्रभु येशू ने शिष्याना शिकवले
- प्रेषितांनी मडळीला शिकवले
- पौल, पेत्र, याकुब यांनी पत्राद्वारे खरे शिक्षण दुरवर असलेल्या मंडळी पर्यंत नेले
पवित्रशास्त्रातील शिकवण आपण अनेक प्रकारे शिकू शकतो. परंतू व्यवस्थितरित्या व विषयवारीने शिक्षण म्हणजे पद्धतशीर ख्रिस्ती सिध्दांत होय. यामध्ये खालील विषय समाविष्ट आहेत.
- पवित्रशास्त्राविषयी सिद्धांत
- देवाविषयी सिद्धांत
- ख्रिस्ताविषयी सिद्धांत
- पवित्रात्म्याविषयी सिद्धांत
- मानवाविषयी सिद्धांत
- पापाविषयी सिद्धांत
- तारणाविषयी सिद्धांत
- मंडळीविषयी सिद्धांत
- दुतांविषयी सिद्धांत
- शेवटच्या काळाविषयी सिद्धांत
No comments:
Post a Comment